
बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटनेच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या एनआरजे राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2025 -26 मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळवताना 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत.
कॉर्पोरेशन स्विमिंग पूल (बीएसी) बसवनगुडी, बेंगलोर येथे गेल्या 9 ते 13 जुलै 2025 या कालावधीत उपरोक्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत कर्नाटकातील 1000 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये स्वीमर्स क्लब बेळगावच्या वेदांत मिसाळे निधी कुलकर्णी आणि अभिनव देसाई यांनी 3 सुवर्ण पदकांसह एकूण 10 पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. यापैकी चमकदार कामगिरीबद्दल वेदांत मिसाळे आणि निधी कुलकर्णी या दोघांची येत्या 3 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या उपनिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद 2025 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
वरील जलतरणपटू बेळगाव येथील केएलईच्या ऑलिंपिक आकाराच्या सुविधेने सुसज्ज सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात येथे प्रशिक्षण घेऊन पोहण्याचा सराव करतात. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन, तसेच डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta