Wednesday , March 4 2026
Breaking News

‘श्रावण’ तोंडावर बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात मांसाहार विक्री तेजीत

Spread the love

 

बेळगाव : श्रावण महिना अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मांसाहाराला मागणी वाढली आहे. येत्या शुक्रवारपासून श्रावण महिना सुरु होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी चिकन आणि मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्रामीण बरोबरच शहरी भागात देखील सकाळपासून चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये मांसाहार प्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी चिकन, मटण, मासे खरेदीला पसंती दिली आहे.

श्रावणापूर्वीच्या बुधवार आणि गुरुवारी मांसाहाराला अधिक मागणी असणार आहे. याशिवाय खेकडे व अंड्यांनाही मागणी वाढल्याचे दिसत आहे. श्रावणमासाला केवळ दोन दिवसांचा कालावधी असल्याने मांसाहार प्रेमींकडून आताच ताव मारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे श्रावण तोंडावर आणि खवय्यांची चंगळ, असे चित्र पाहावयास मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *