Monday , April 20 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने मच्छे व लक्ष्मीनगर मच्छे येथील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
मराठी प्राथमिक शाळा मच्छे येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.के. बेळगावकर हे होते.

युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या विविध उपक्रमाची माहिती दिली आणि तर सहकारी श्री प्रशांत नांदोडकर यांनी सिमाभागात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण अत्यंत महत्वाचे असलयाचे नमूद केले. युवा समितीचे सहकारी श्री. सागर कणबरकर आणि गजानन छपरे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

तर लक्ष्मी नगर मच्छे येथील शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे एसडीएमसीचे अध्यक्ष श्री. चौगुले होते. युवा समितीचे सहकारी गजानन छपरे व साईनाथ शिरोडकर यांनी युवा समितीच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच यावेळी शिक्षकांनी युवा समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमामुळे मराठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत असल्याचे नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष राजू कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, केदारी करडी, अमोल लाड, दीपक सनदी, प्रशांत नांदोडकर, गजानन छप्रे, मयूर मजुकर, सागर कणबरकर, मुख्याध्यापक श्री. ज्योतिबा रेमाणी, श्री. बी. व्ही. शेळके व शिक्षकवृंद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *