
बेळगाव : एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय सुंठकर यांना सामाजिक सेवेबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
अमेरिकन विजडम पीस युनिव्हर्सिटी या संस्थेकडून संजय सुंठकर यांना डॉक्टरेट ( in social service) ही पदवी बहाल करण्यात आली.
बेंगळूर येथील क्लॅरेस्टा फॉर्च्युन हॉटेलच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात संजय सुंठकर यांना मान्यवरांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना ही पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्यावतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta