Sunday , July 26 2026
Breaking News

पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान देणे हे शिक्षकांचे कर्तव्य : कुलगुरू त्यागराज

Spread the love

 

विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलन

बेळगाव : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान देऊन त्यांची उत्तम जडणघडण कशी करावी तसेच शिक्षकाने विद्यार्थी यांच्या नातं इतकं दृढ असावी की विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःहून शिक्षकाकडे यावेत तरच विद्यार्थ्यांची प्रगती होते असे उद्गगार विद्याभारती जिल्हा शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज यांनी केले.
त्यानंतर प्रमुख वक्ते राघवेंद्र कागवाड यांनी परिसर पर्यावरण, भारतीय संस्कृती, बदलती कुटुंब पद्धती व नागरिक शिष्टाचार याबद्दल अमूल्य विचार शिक्षकांना आपले व्यक्त केले.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजीमध्ये शाळेच्या माधव सभागृहात बेळगाव जिल्हा शैक्षणिक संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू त्यागराज, प्रमुख वक्ते म्हणून राघवेंद्र कागवाड, राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राजेंद्र कुलकर्णी, जिल्हा सचिव एस एल कुलकर्णी, विज्ञान प्रमुख एस व्ही व्हनुले रामनाथ नाईक, महेश नरगुंदकर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सुजाता दप्तरदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तर प्रास्ताविक भाषण परमेश्वर हेगडे यांनी केले व संपूर्ण देशात सुरू असलेल्या विद्या भारतीच्या कार्याची माहिती दिली. यानंतर शिक्षकांना त्यांच्या विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्याभारतीच्या वतीने आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती शिक्षकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी तर एस व्ही कुलकर्णी यांनी आभार मानले. या शैक्षणिक संमेलनाला संत मीरा अनगोळ, संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, हनिवेल स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे देवेंद्र जिंनगौडा स्कूल, रामदुर्ग येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *