बेळगाव : विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत. यासाठी पालकांनी मुलांना योग्य सवयी लावणे आवश्यक असते. आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच, इतर छंद जोपासण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य घ्यावे. योग्य नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावे. आईवडील हेच आधार असतात, असे मौलिक विचार निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी व्यक्त केले.
बिजगर्णी हायस्कूल पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश कांबळे होते.
इशस्तवन व स्वागत गीत विद्यार्थ्यिनिनी सादर केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक क्रीडा शिक्षक अरुण दरेकर यांनी केले.शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी घेऊन, जबाबदारी स्वीकारून शिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक रमेश कांबळे, रूपाली सरवणकर, यांनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर मल्लापा मोरे (कावळेवाडी) शिवाजी तारीहाळकर, विजया कांबळे, संजय मोरे, रुक्मिणी कोळी, केदारी हलकर्णीकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कावळेवाडी, बिजगर्णी गावातील विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन दीपा बेळगावकर, आभार विजया शिंदे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta