Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक सोमवार दि. 28/07/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सूचनेनुसार ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीसाठी येळ्ळूर विभाग मधून सदस्य निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या सर्व पदाधिकारी, आजी माजी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, तसेच आजी माजी ग्राम पंचायत सदस्य सदस्या, गावातील निष्ठावंत नेते, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यांनी बैठकीला वेळेत हजर राहावे असे आवाहन श्री. विलास ना. घाडी अध्यक्ष येळ्ळूर विभाग म ए समिती यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *