
बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि मराठा पंच मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
आज बुधवारी सकाळी वेद पठण, देवीला अभिषे,कुंकुम पूजा व महापूजा होणार आहे. उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून दुर्गा सप्तशती, नवचंडी पाठ प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नवचंडी होम, स्वती पुण्याह वाचन, सवै भक्त संकल्प, नवग्रह स्थापना पूजन, महामृत्युंजय देवता स्थापन पूजन, ब्रह्मादि मंडळ स्थापन पूजन, नवदुर्गा मंडळ स्थापन पूजन, महामृत्युंजय होम, बंली पूर्णा हुती, महानैवेवैद्य, महाआरती, सायंकाळी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी महाआरती आणि दुपारी महाप्रसाद वाटप होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta