बेळगाव : छत्तीसगड पोलिसांनी दोन कॅथोलिक नन्सना अटक केल्याच्या घटनेचा बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी तीव्र निषेध केला आहे. अटक करण्यात आलेल्या नन्स व युवकासाठी प्रार्थना करण्याचे आणि या अटकेविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
केरळ येथील दोन कॅथोलिक नन – सिस्टर प्रीती मेरी व सिस्टर वंदना फ्रान्सिस, ज्या अॅसिसी सिस्टर्स ऑफ मेरी इमॅक्युलेट या संघटनेशी संबंधित आहेत, तसेच एक युवक सुकामन मांडवी यांना दुर्ग रेल्वे स्थानकावर छत्तीसगड पोलिसांनी मानवी तस्करी व धर्मांतरणाच्या खोट्या आरोपाखाली अटक केली.
“या संघटनेच्या सिस्टर्स आमच्या बागलकोटच्या धर्मप्रांतात सेवा देत आहेत आणि त्या जात, धर्म न पाहता बागलकोटच्या जनतेसाठी जी सेवा करत आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी आहोत. या घटनेमुळे देशभरात वाद व निषेध निर्माण झाले असून, देशभरातील ख्रिस्त्यांप्रमाणेच बेलगावी धर्मप्रांतातील ख्रिस्ती देखील या निरपराध नन व युवकावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करतात,” असे बिशप फर्नांडिस यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta