बेळगाव : शेतकऱ्यांसाठी लिंकविरहित तात्काळ युरिया पुरवठा व्हावा तसेच शेतामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी वडगाव, येळ्ळूर, यरमाळ, धामणे याभागातील ग्रामीण शेतकरी व महिला जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच परिवहन आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे सकाळी 11 वाजता शेतकरी व महिलांची एकत्रित सभा होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व शेजारी असलेल्या परिवहन आयुक्त कार्यालयावर धरणे धरले जाणार आहे. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव तसेच इतर ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta