
बेळगाव : सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी महादेवी करेन्नावर वय वर्षे 45 या महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. सदर खून पैशाच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यादृष्टीने तपास करत एपीएमसी पोलीस पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महादेवी करेन्नावर या सदाशिवनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करून घरी परतत होत्या त्यावेळी तिच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संतोष जाधव वय वर्षे 38 श्रीनगर हा ऑटो चालक करून मृत महिलेच्या परिचयाचा होता. संतोष यांनी महादेवी यांना काही दिवसांपूर्वी 10 हजार रुपये उधारी दिले होते. संतोष यांनी परतफेडीसाठी तगादा लावला होता. काही दिवसांपूर्वी महादेवी व संतोष यांच्यात वाद झाला होता. परतफेडी संदर्भात वाद झाल्यामुळे रागाच्या भरात संतोष याने महादेवी ही रस्त्यातून जात असताना पाठीमागून वार करून तिची हत्या केली. घटनास्थळी मिळालेले ठोस, पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींमुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अवघ्या पाच तासात त्याला अटक केली व आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एपीएमसी पोलिसांच्या या जलद कारवाईचे कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta