Monday , September 21 2026
Breaking News

युवा नेते शुभम शेळके यांना पुन्हा तडीपारीची नोटीस

Spread the love

 

८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश

बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यावर पोलिस प्रशासनाने पुन्हा तडीपारीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्तांनी ही नोटीस दिली असून ८ ऑगस्ट रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

तडीपारीची ही नोटीस म्हणजे मराठी कार्यकर्त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे. या अन्यायाविरुद्ध मराठी भाषिकांनी आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *