बेळगाव (वार्ता) : आनंद नगर वडगाव येथे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून व आनंद नगर रहिवासी संघटनेच्या सहकार्यातून कोविशील्ड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस सुमारे दोनशे पंधरा जणांना देण्यात आला. सोमवार (ता. 2) रोजी आनंद नगर वडगाव येथील शिव मंदिरामध्ये हे लसीकरण पार पडले. प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आनंद नगर रहिवासी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पवार होते. यावेळी डॉक्टर शिल्पा व संतोष पवार यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. तर नंदी पूजन प्रा. बळीराम कानशीडे यांनी केले.
व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सौ. सारिका पाटील, बेळगाव दक्षिण भाजपचे माजी अध्यक्ष मंगेश पवार, डॉक्टर शिल्पा अमृत मिरजकर, मल्लाप्पा कुंडेकर, परिचारिका सिस्टर विद्या व सहाय्यक मंजुनाथ कडकोळ आदी उपस्थित होते. निवृत्त शिक्षक पी. ए. पाटील यांनी लसीकरण मोहीम आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला व त्याचे महत्त्व विशद केले व सर्वांनी लस घेऊन तंदुरुस्त राहण्याची विनंती केली. उपाध्यक्ष संतोष पवार यांनी डॉक्टर व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी दोनशे पंधरा जणांना कोविशील्डचे लसीकरण करण्यात आले. यावेळी आनंद नगर रहिवासी संघटनेचे सेक्रेटरी अमृत मिरजकर, प्रा. बळीराम कानशीडे, मल्लाप्पा कुंडेकर, बाळू तंमूचे, अनिल गोकाक, सिताराम वेसणे, मधुकर सुतार, बाळासाहेब कोकरे, पी. जे. घाडी, बी. एम. पाखरे, चंद्रकांत धुडुम, अप्पाजी कुगजी आदी उपस्थित होते. शेवटी पी. ए. पाटील यांनी आभार मानले. लस घेण्यासाठी नागरिकांनी शिव मंदिर मध्ये मोठी गर्दी केली होती.