
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी. निलजी शाळेचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. 79 वा स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये विशेष उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण निवृत्त सैनिक नागेंद्र रामा मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ. विनंती गोमानाचे व सर्व महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजाचे पूजन समाजसेविका माधुरी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
तिरंगी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. एल. वाय. पाटील होते. प्रमुख पाहुणे माजी ग्रामपंचायत सदस्या भरमा गोमानाचे, ग्रामपंचायत सदस्य मधु मोदगेकर, आप्पाजी अक्षीमणी, भाऊराव मोदगेकर, किरण पाटील, शामराव पाटील, भावकाण्णा मोदगेकर, सिद्राय हिरापाचे, धनाजी मोदगेकर, प्रकाश पाटील, दीपक केतकर उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी. के. घोलपे यांनी केले. तिरंगी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तीन रंगापासून कागदकाम, तीन रंगापासून खाद्यपदार्थ, तिरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. कागद कामांमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेची प्रतिकृती, राष्ट्रीय पक्षी मोर, देशाचा नकाशा, चंद्रयान इत्यादी कलाकृती बनविल्या होत्या. खाद्यपदार्थमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगी इडली, तिरंगी मोदक, सँडविच, गाजर, काकडी, मुळा इत्यादी वापर करून विविध कलाकृती सादर केल्या होत्या. रांगोळीमध्ये मुली वाचवा, भारतीय संस्कृतीचे दर्शन यासारखी संदेशात्मक रांगोळ्या तसेच लाल किल्ला, वंदे मातरम, यासारख्या देशाभिमान जागृत करणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध भाषेतील भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली. सौ. गार्गी पाटील व डॉक्टर स्नेहल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी निवृत्त सैनिक रामा मोदगेकर यांनी 5555 रु. देणगी दिली. राम मंदिर ट्रस्टकडून विद्यार्थ्यांना 25 खेळ गणवेश देणगी रूपात देण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले. मारुती मोदगेकर यांनी 100 वह्या देणगी रूपात दिल्या. यावेळी माधुरी जाधव यांनी आपल्या मातोश्रीच्या वाढदिवसानिमित्त 1001 रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैजनाथ रामाराव व सौ एम आर अनगोळकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. आर एस पाटील यांनी केले. यावेळी एसडीएमसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta