Tuesday , March 3 2026
Breaking News

येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटीतर्फे आयोजित श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी शुभारंभ कार्यक्रम काल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

येळ्ळूरचे माजी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रा. पं. सदस्या शांता काकतकर, माजी जि. पं. सदस्य दत्तात्रय लोहार, अभियंता प्रसाद मानकोजी, ग्रा. पं. सदस्य कलाप्पा मेलगे, व्यावसायिक मारुती मादाकाचे, कंत्राटदार परशराम कणबरकर, सतीश धामणेकर, निवृत्त कार्यकारी अभियंता डी. एम. बण्णूर, प्रकाश भंगी व संतोष नायकोजी उपस्थित होते. प्रारंभी स्वागताध्यक्ष कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष महादेव काकतकर यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह छ. शिवाजी महाराज, श्री गणेश, श्री कलमेश्वर, श्री बसवाण्णा यांच्या प्रतिमेचे तसेच कळस स्लॅबचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे कॉलम पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. याप्रसंगी श्रीधर कानशिडे, रमेश उडकेकर, सोमनाथ धामणेकर, बाळकृष्ण धामणेकर, प्रकाश मालूचे, महादेव कदम, अनिकेत चौगुले, बसवंत कुगजी, प्रशांत नंदीहळ्ळी, राजू पावले, रजत संताजीचे, मनोज बाचोळकर, प्रकाश डोण्यान्नावर, श्रीकांत माणकोजी, नामदेव कदम, महादेव धामणेकर, महेश हट्टीकर, कुमार तोपिनकट्टी, शंकर गोरल, बंडू नंदी, अरविंद पाटील, शिवाजी सांबरेकर, ज्ञानेश्वर कुंडेकर आदींसह निमंत्रित मंडळी आणि कलमेश्वर गल्ली व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *