बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू असून सदर घटना शहरातील निंगापूर पेठ येथील महादेव मंदिराजवळ घडली. ७५ वर्षीय वामनराव बापू पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घराचे छत कोसळले आणि मातीत गाडले गेले. त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. रामदुर्ग अग्निशमन विभाग आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृताचा शोध घेतला आणि मृतदेह बाहेर काढला.
रामदुर्गच्या पीएसआय सविता मुन्याळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta