Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर येथील जवानाचा लखनऊ येथे मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर संभाजी गल्ली येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान राहूल आनंद गोरल (वय 33 ) यांचा लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेले काही महिन्यांपासून ते आजारी होते. सैन्य दलाच्या कार्यालयातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोपानुसार त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार रोजी सायंकाळी 5 वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. राहुल हे तेरा वर्षांपासून सैन्य दलामध्ये कार्यरत होते. त्यांना लेखनाचा छंद होता. त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे त्यांची आई अनिता गोरल या त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सोबत होत्या. राहुल यांच्या पश्चात आई, एक विवाहित बहीण, भावोजी, असा परिवार आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *