Friday , March 6 2026
Breaking News

संत मीरा, जी जी चिटणीस, बालिका आदर्श अंतिम फेरीत

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, जी जी चिटणीस, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने गोमटेश शाळेचा 6-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने प्रेशयस ब्लाजम शाळेचा 6-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 4-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श शाळेने ओरिएंटल शाळेचा 7-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, स्पर्धा आयोजक सचिव अशोक मुन्नोळी, जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकने या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंच उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, व यश सुतार, हणमंत अडोनी, समीक्षा बुद्रुक, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *