बेळगाव : मूळचे चव्हाट गल्ली येथील रहिवासी (सध्या महावीर रोड, मारुतीनगर) येथे वास्तव्यास असणारे प्रणव चंद्रकांत संभाजीचे (वय 24) याचे कार अपघातात निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील एक बहीण असा परिवार आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चव्हाट गल्लीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार आहे.
गुरुवारी मध्यरात्री फोटोग्राफी करुन परत येत असताना होनगा जवळ एनएच4 महामार्गावरील उड्डाणपुलावर रस्ता बंद असलेल्या ठिकाणी लावलेल्या दुभाजकाला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात प्रणवचा मृत्यू झाला असून पिरनवाडी येथील एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta