Sunday , July 26 2026
Breaking News

विसर्जनावेळी नटबोल्ट काढण्यासाठी आता मशीन

Spread the love

 

गणेशोत्सव मंडळांचा त्रास होणार कमी : प्रशासनाचा निर्णय

बेळगाव : कपिलेश्वर विसर्जन तलाव व रामतीर्थ तलाव येथे गणेशमूर्ती तयार करताना बसविलेले नट बोल्ट खोलण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे विसर्जन तलावांवर सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी आल्यानंतर मूर्ती ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला पाट व मूर्तीच्या इतर कामांत नट बोल्ट वापरले जातात. त्यामुळे मूर्ती विसर्जन करतेवेळी मंडळाचे कार्यकर्ते नटबोर्ड इतर साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा नटबोल्ट वेळेत खुले होत नाहीत तसेच नटबोर्ड खोलण्यासाठी पाना नसल्याने अनेकदा मूर्ती खुली करणे मुश्कील होते व विसर्जनास उशीर होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक चार्जरवर चालणारी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी गणेश मूर्ती कशाप्रकारे तयार केली जाते, याची माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर कपिलेश्वर व रामतीर्थ तलाव येथे मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळांची मोठी अडचण दूर होणार आहे. शहर आणि परिसरात ३८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. मात्र, सर्वाधिक गर्दी कपिलेश्वर व रामतीर्थ तलाव येथे होते. याची दखल घेऊन दोन ठिकाणी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *