
बेळगाव ; अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 8-6 असा पराभव केला, मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बालिका आदर्श शाळेने संत मीरा शाळेचा 5-4- असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुण्या संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, स्पर्धा आयोजक सचिव अशोक मुन्नोळी, जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकने या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पंच उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार व यश सुतार, हणमंत अडोनी, समीक्षा बुद्रुक, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta