Thursday , December 26 2024
Breaking News

बेळगावचा किल्ला संवर्धनासाठी गेली 3-4 वर्षे झटताहेत श्री दुर्ग सेवा बेळगावचे दुर्गसेवक

Spread the love


बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले. इ. स.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते, पण कालांतराने परकीय आक्रमणाने या गडकिल्ल्यांची पडझड होत चालली आहे. बेळगावचा भुईकोट किल्ला देखील याला अपवाद नाही.
या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक शिवापाईकाचे आद्य कर्तव्य आहे. गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. तर बेळगावच्या किल्ल्याची होत असलेली पडझड श्री दुर्ग सेवा बेळगाव च्या दुर्ग सेवकांना पहावली नाही. ते 2008 पासून राजहंस गडाचे कार्य करत असताना गेली 3 ते 4 वर्षे झाली दुर्ग संवर्धन आपले आद्य कर्तव्य म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करत आहेत. आठवड्यातील एक दिवस म्हणजेच प्रत्येक रविवारी हे दुर्ग सेवक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. निस्वार्थ भावनेने हे कार्य करत आहेत. ह्यांचा स्वार्थ एवढाच की हा किल्ला संवर्धनशिल व्हावा.

About Belgaum Varta

Check Also

राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *