बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित व एसपी ऑटो ॲक्सेसरीज पुरस्कृत 47 वी श्री गणेश चषक चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाहू निळकंठाचे याने संतोष शेळके पाटील याचा एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळून तिसऱ्यांदा श्री गणेश चषक पटकाविला.
सरदार मैदानावरती खेळवण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना शाहू निळकंठाचे व संतोष शेळके पाटील यांच्यात झाला. संतोष शेळके पाटीलने प्रथम फलंदाजी करताना एक षटकात दोन चौकारासह 12 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल खेळताना शाहू निळकंठचे पहिले दोन चेंडू निर्धाव गेले तिसरा चेंडू वरती एक धाव त्यानंतर सलग दोन चेंडू वरती दोन उत्तुंग षटकार खेचून शाहू निळकंठाच्याने एक चेंडू बाकी ठेवत विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरुष करते शरद पाटील, सुहास पाटील, पंच बाबुराव कुट्रे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रतीक पाटील, बाबू इंगोले, मनोज निर्मळकर, मंगेशकर, दीपक पवार, आदित्य पाटील, गंगाधर पाटील, राहुल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाहू निळकंठाचे याला आकर्षक चषक, रोख रक्कम व भेटवस्तू दोन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या संतोष शेळके पाटीलला चषक, व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
वैयक्तिक बक्षीस– उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – रोहित मुरकुटे, उत्कृष्ट यष्टीरक्षक निखिल चंदग, उत्कृष्ट झेल ईश्वर आनंदपुर, उत्कृष्ट फलंदाज सुनील पाटील, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू- राहुल पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पवन बडवानाचे चषक देऊन गौरवण्यात आले. पंच , सुनील पाटील, नामदेव उंद्रे, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील, सुशांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta