बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची वाट मोकळी झाली आहे. बेळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता सर्व मरठा बांधवानी धर्मवीर संभाजी चौक येथे हजर रहावे, असे आवाहन बेळगाव सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta