राजहंसगड : राजहंसगड – देसुर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, या खड्ड्यामुळे येथील नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
राजहंसगड गावच्या वेशीत असलेल्या ब्रिज जवळ मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अपघात घडत आहेत, त्यामुळे येथील जनता त्रस्त झाले आहे, तरी जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.
आज सकाळी इथून जात असताना दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाला आहे, त्यामुळे बराच काळ या ठिकाणी वाहनांची रांग लागून काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता, असे दररोज या ठिकाणी घडत आहे तरी याची दखल शासनाने घ्यावी व लवकरात लवकर परिसरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta