बेळगांव : गणेशपुर रोड येथील गुडस शेफर्ड शाळेच्या टर्फ मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय प्राथमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनच्या दिवशी संत मीरा, सेंट जोसेफ, सेंटपॉल, भरतेश, डीपी शाळेच्या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्राथमिक मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने तात्यासाहेब मुसळे वडगाव क्लस्टरचा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भरतेश स्कूलने संत मीरा शाळेचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. माध्यमिक मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने भरतेश शाळेचा तर संत मीरा शाळेने कनक शाळेचा पराभव करित अंतिम फेरीत प्रवेश केला. माध्यमिक मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफ शाळेने गजाननराव भातकांडे शाळेचा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डीपी शाळेने महातेशनगर विभागाचा पराभव करत अंतिम करीत प्रवेश केला. प्राथमिक मुलींच्यात सेंट जोसेफ व संत मीरा शाळेना प्रतिस्पर्धी संघ नआल्यामुळे पुढे चाल मिळाली. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, के आर शेट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, कॅम्प विभाग माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंण्णावर, टिळकवाडी माध्यमिक विभाग संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, अन्थोनी डिसोजा, चंद्रकांत पाटील, बापू देसाई, संतोष दळवी, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवधनम, मार्गरेट डिसोजा, या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पंच किरण तरळेकर, यश सुतार, मानस नायक, मारुती मगदूम, हर्ष रेडेकरसह विविध शाळेचे क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta