बेळगाव : संजीवीनी फौडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून संजीवीनी जेष्ठ नागरिकांसाठी उमंग या नृत्य व गायनाच्या स्पर्धांचे आयोजन करीत असून यावर्षीही 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ
नागरिक दिनाचे औचित्य साधून गायन, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य अशा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रथम या स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात होणार असून ५ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्पर्धकांनी गाण्याचे आणि नृत्याचे व्हिडीओ वॉट्सअपद्वारे या 8904950603, 7676625745 क्रमांकावर पाठवून द्यायचे आहेत.
यातील पाच सर्वोत्तम स्पर्धकांची निवड केली जाणार असून त्यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आपली कला सादर करायची आहे. त्यातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील अटी, नियम अर्ज यासाठी संजीवीनी फोंडेशन, आदर्शनगर वडगाव अथवा अध्यक्ष मदन बामणे (९४४८१९१२६६) संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ (७३४९६७०१४६) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीतजास्त जेष्ठ नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta