Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगावात रविवारी ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ वितरण

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी बडोदा येथे झालेल्या 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

गणपत गल्ली, बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये 25 हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. तरी शहरातील साहित्यप्रेमींनी बहुसंख्येने या पुरस्कार वितरण सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड व कार्यवाह सुनीता मोहिते यांच्यासह कार्यकारी मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love  बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *