Monday , September 21 2026
Breaking News

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवारी होणार!

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी तज्ञ समितीची बैठक होणार आहे. सदर बैठक दुपारी ३ वाजता समिती कक्ष क्रमांक पाच, सातवा मजला मंत्रालय, मुख्य इमारत येथे आयोजित केली आहे अतिथीगृहात होणार आहे.

सदर बैठक तज्ञ समितीचे अध्यक्ष तथा लोकसभा सदस्य श्री. धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकसभा सदस्य, तथा सहअध्यक्ष तज्ञ समिती श्री. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या बैठकीकडे सीमावासीयांचे लक्ष लागून आहे. बुधवारी बैठक आयोजित केल्‍यामुळे मध्‍यवर्ती म. ए. समितीने आभार मानले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *