बेळगाव : पिरनवाडी येथील डिवाईन मर्सी शाळेच्या मैदानावर क्लस्टर लेव्हल स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धा दि. 26/8/2025 रोजी येथे संपन्न झालेल्या 14 वर्षाखालील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुलांनी व मुलींनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. 4×100 रिले मुलींनी दुर्वा पाटील, भक्ती बिर्जे, तेजश्री धुळजी व मलप्रभा धामणेकर यांनी प्रथम क्रमांक.
तर वैयक्तिकमध्ये 600 मी. धावण्याचा स्पर्धेत श्रीओम धुळजी तृतीय व दुर्वा पाटील 200 मी. मध्ये तृतीय आणि लांब उडी मध्ये भक्ती बिर्जे तृतीय क्रमांक पटकवीला.
सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक आय. बी. राऊत, श्री. एम. एम. डोंबले (क्रीडा शिक्षक), स्नेहल मजुकर, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, दिपा हट्टीकर.तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेहि मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विध्यार्थी, पालक व गावकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले व पुढील तालुका पातळीवर स्पर्धासाठी शुभेच्छा देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta