बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने बेळगाव शहर उपनगर तालुका तसेच तसेच खानापूर आणि ग्रामीण भागातील 37 शिक्षकांचा, शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
शिक्षक हे युवा पिढी घडवून देशाच्या भविष्याचा पाया रचत असतात. विद्यार्थांमधील सुप्त जाणून, त्यांना योग्य मार्ग दाखण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करतात. मार्गदर्शक बनून विद्यार्थांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व शिक्षकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सिटी सेंटर शाखेच्या वतीने शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेळगाव शहर उपनगर तालुका तसेच ग्रामीण भागातील कन्नड मराठी इंग्रजी भाषेतील प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयांचे प्राध्यापक प्राचार्य शिक्षक असे एकूण 37 जणांचा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महेश फौंडेशन, आर्मी स्कूल, कोवाड केंद्रीय स्कूल, बीएड कॉलेज, आरएलएस कॉलेज, केएलई सोसायटी, आदी मान्यवर शैक्षणिक संस्थांबरोबरच कंग्राळी गणेशपुर खानापूर गुंजी सुलधाळ वंटमुरी हुनसीकट्टी आधी ग्रामीण भागातील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्योती कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत पाटील, शिक्षण विभागाच्या बेळगुंदी सीआरपी सुवर्णा पाटील, यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारी शहर विभागाच्या संचालिका ब्रह्माकुमारी साधना बहन, ब्रह्माकुमारी संपत्ती, ब्रह्माकुमारी महादेवी, ब्रह्माकुमारी भाग्यश्री, यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारीचे अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या विश्वशांती आणि समाजासह देश हिताच्या अनमोल कार्याबद्दल उपस्थित शिक्षक मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta