Sunday , July 26 2026
Breaking News

उच्च ध्येय ठेऊन प्रयत्न केले तर यशाचे शिखर सहज गाठता येते; शिवराज पाटील

Spread the love

 

बेळगाव : उच्च ध्येय ठेऊन सातत्याने प्रयत्न केले तर यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन पायोनियर अर्बन बँकेचे संचालक शिवराज पाटील यांनी कै. खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
येथील सह्याद्री पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य ट्रस्टी चंद्रकांत गोडसे होते. तर व्यासपीठावर ट्रस्टी शशिकांत पाटील, विनोद भोसले, पी. ए. पाटील व शिवाजी हंडे होते.
यावेळी शिवराज पाटील यांनी आजचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा यशस्वी वाटचालीला उर्जा निर्माण करणारा असून शैक्षणिक बळ देणारा असून 66 वर्षापूर्वी खेमाजीराव गोडसे यांनी दूरदृष्टी ठेवून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत व्हावी यासाठी सुरू केलेल्या ट्रस्टचे कार्य त्यांच्या पश्चात गोडसे कुटुंबियांनी सुरू ठेवले आहे. हा समाजासमोर आदर्श असल्याचे सांगितले.
यावेळी दहावी परिक्षेत तसेच हिंदी व संस्कृत या विषयात विशेष प्राविण्य मिळविलेल्या बहुजन समाजातील निधी कंग्राळकर, वेदिका मुचंडी, युक्ती देसाई, अन्वी पाटील, साधना कुगजी, प्रसाद मोळेराखी, श्रीराज चौगुले, यश गुग्गरहट्टी समर्थ बागेवाडी, अथर्व खन्नूकर यासह तीस विद्यार्थ्यांना एक लाख रूपयांची रोख रक्कम व प्रशस्तीपत्र मान्यवर व गोडसे कुटुंबियांतील व्यक्तींच्या हस्ते देण्यात आले.
प्रारंभी शिवराज पाटील यांनी कै. खेमाजीराव गोडसे यांच्या फोटोचे पूजन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालकांच्या वतीने शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. स्मिता काळे यांनी स्वागत केले तर विनोद भोसले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, प्रास्ताविक व सुत्रसंचालन पी. ए. पाटील यांनी तर आभार संग्राम गोडसे यांनी मांडले. या कार्यक्रमाला पालक व गोडसे कुटुंबिय उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *