बेळगाव : माधवपूर वडगाव पहिला बस स्टॉप येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने अनेक अपघात घडले आहेत. मंगळवारी सकाळी समाजसेवक येलोजीराव पवार, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुभाष देसाई व आनंद शहापूरकर यांनी या गंभीर समस्येबाबत बेळगाव ट्राफिक पोलिसांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात बस स्टॉपजवळ स्पीड ब्रेकर बसवणे, तसेच ऑटो रिक्षांनी कॉर्नरवर थांबू नये यासाठी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
ट्राफिक पोलिस सीपीआय बसनगौडा पाटील यांना समस्या सविस्तर कळविण्यात आली. त्यानंतर बसनगोडा पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta