बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, गदग यांच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा गेम्स २०२५ (हॉकी) महात्मा गांधी हॉकी स्टेडियम, बेटगेरी-गदग येथे झालेल्या बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेच्या हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या.
सदर हॉकी स्पर्धेत बेळगाव इलेव्हन संघाने डी वाय एस एस धारवाड संघाच्या विरोधात ३-० ने विजय प्राप्त करून विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला.
बेळगाव इलेव्हन संघाने कर्णधार प्राजक्ता निलजकर हिच्या नेतृत्वाखाली भूमी कुगजी, नंदिनी गुरव, सविता गोरल, श्रेया पाटील, आदिती ठक्कर, सानिका पाटील, निकिता कवळेकर, नेत्रा गुरव, भावना किल्लारगी, प्रतीक्षा गुरव, सुकृती कासार, खुशी गुरव, राधिका धबाले, धनश्री शिंदे, प्रीती नांदूडकर, श्रुती हिरेमठ, वैष्णवी माळवणकर यांचा हॉकी संघात समावेश होता.
यावेळी हॉकी बेळगावचे पदाधिकारी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रशिक्षक उत्तम शिंदे, गणपत गावडे, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता वेसणे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta