
बेळगाव : बेळगावातील श्री बसवेश्वर को–ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी वीरुपाक्षप्पा झोन्ड यांची तर उपाध्यक्षपदी दीपा महांतेश कुडची यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावातील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासकीय कचेरीत संचालक मंडळाची आज मंगळवारी झाली. या बैठकीत नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालकांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी सी. एच. कट्टीमनी, बी. व्ही. उप्पीन, आर. एस. सिद्दण्णावर, बी. बी. कग्गनगी, एस. आर. शिवन्नावर, सरला हेरेकर, पी. एम. बाळेकुंद्री, आर. एम. कळसन्नावर, व्ही. एस. हुलमनी, एस. के. पाटील, भरतेश शेबन्नावर, एस. एस. वाली, बी. जी. न्यामगौडा, सी. एस. शेट्टी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta