Thursday , June 20 2024
Breaking News

संकेश्वरात पतंजलीची इकोफ्रेंडली रंगपंचमी, खेडोपाड्यात अमाप उत्साहात रंगोत्सव साजरा..

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. योगगुरु आणि योग साधकांनी एकमेकांना पर्यावरण पुरक रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. योगशिक्षक पुष्पराज माने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले पतंजली योग समितीतर्फे आज इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. सणसमारंभ त्या-त्या दिवशीच साजरे करायला हवे. हिंदू धर्मात होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी सणाला अन्यन साधारण महत्व दिले गेले आहे. सणसमारंभ ॲडव्हांन्स साजरे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीच्या रंगोत्सव सौ.शैलजा जेरे, शिवलिला कुंभार, विजयालक्ष्मी भागवत, प्रमिला देसाई, सुरेखा शेंडगे, योग शिक्षक परशराम कुरबेट, नागराज नाईक, श्रीनिवास कोळेकर, अप्पासाहेब पाटील, रावसाहेब कंबळकर, नारायण खटावकर, मलप्पा कुरबेट योगसाधक सहभागी झाले होते. हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्साही वातावरणात रंगोत्सव साजरा केला. रंगोत्सवात अशोक मास्तीहोळीमठ,झरण फर्नांडिस, बल्लू कदम, मारुती बस्तवाडी, जयप्रकाश खाडे, रवि पाटील, पुष्पराज माने सहभागी झाले होते.

खेडोपाड्यात रंगांची बरसात

संकेश्वर लगतच्या महाराष्ट्र राज्यातील नांगनूर अरळगुंडी खनदाळ, कडलगे, तसेच हुक्केरी तालुक्यातील खेडोपाड्यात आज रंगांची बरसात होताना दिसली. रंगोत्सवात अबालवृध्दांंचा तसेच मुली आणि महिलांचाही सहभाग दिसला.

संकेश्वरात रंगांना मोठी मागणी

धुलीवंदन -रंगपंचमीचा सण कोरोनामुळे गेली दोन वर्षे साजरा करता आला नाही. यंदा रंगोत्सव साजरा करता आल्यामुळे युवा वर्गात मोठा उत्साह निर्माण झालेला दिसला. बाजारात रंगांच्या पावडरला मोठी मागणी दिसली. रंगांची पावडर पर्यावरण पुरक आणि स्वस्त असल्यामुळे त्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. युवा वर्गात पक्के कडक रंग पसंतीला उतरलेले दिसले. रंगोत्सवात विशेष करुन काॅलेज युवती आणि महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

About Belgaum Varta

Check Also

भेदभाव न करता विकास कामे राबवणार : खासदार प्रियांका जारकीहोळी

Spread the love  शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *