बेळगाव : शिवाजीनगर, बेंगळूर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्थानक असे करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. सदर निर्णयाला कर्नाटकातून तीव्र विरोध होत आहे.
शिवाजीनगर स्थानकाचे नाव सेंट मेरी असे न करता छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून येत्या सोमवारी जाहीर निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देण्यासाठी सर्व शिवप्रेमी बांधव व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी सोमवारी दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta