बेळगाव : बेळगाव शहरातील सेंट्रल बस स्टॅन्ड मधील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे.
मोनीषा मनीगंडण (वय 28) रा. तिरुपट्टूर, जोलरपट्टी वेल्लोर तमिळनाडू असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी निपाणीच्या ज्योती पाटील या बेळगाव बस स्थानकावरून बसमधून खाली उतरत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. त्या चोरी प्रकरणाचा तपास मार्केट पोलिसांनी सुरू केला होता त्यावेळी तमिळनाडूचे महिलेकडून सदर पुण्याच्या दागिन्याचा हार जप्त करण्यात आला आहे.
51 ग्रॅम सोन्याचा हार जवळपास पाच लाख 65 हजार किमतीचा सदर महिलेकडून जप्त करण्यात आला आहे. मार्केट पोलीस निरीक्षक महंतेश द्यामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस संघातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर चोरट्या महिलेचा तपास लावला आहे. बेळगाव सेंट्रल बस स्थानकावरील चोरी प्रकरणाचा तपास लावल्याने पोलीस आयुक्तांनी मार्केट पोलिसांच्या अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta