Monday , December 8 2025
Breaking News

अशोकनगरमधील ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे उद्घाटन…

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या अशोकनगरमध्ये तयार करण्यात आलेल्या महानगरपालिका संचालित ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण करण्यात आले.

बेळगावच्या अशोकनगरमध्ये फिरोज सेठ आमदार असताना ऑलिंपिक दर्जाचा हा जलतरण तलाव उभारण्यात आला होता. आज उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रियाझ किल्लेदार, महानगरपालिका आयुक्त शुभा बी. आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले, “बेळगावातील जलतरणपटूंसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. 50 मीटर लांबीचा हा जलतरण तलाव दहा वर्षांपूर्वी दूरदृष्टीने माझे बंधू आणि माजी आमदार फिरोज सेठ यांनी बांधला होता. बेळगावातूनही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तयार व्हावेत, या उद्देशाने त्यांनी हे बांधकाम केले होते. तसेच, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनाही संधी मिळावी, हे त्यांचे ध्येय होते.” लवकरच विनायकनगर आणि जाधव नगरमध्येही जलतरण तलावांचे लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी सांगितले की, “आमदारांच्या निधीतून उभारलेल्या या जलतरण तलावाच्या उद्घाटनात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने तसेच नगरसेवक, आभा फाउंडेशन आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. बेळगावातील खेळाडू, सरकारी शाळेतील मुले आणि गरीब मुलांसाठी महानगरपालिका माफक दरात सेवा देणार आहे.”

यावेळी आभा स्पोर्ट्सचे प्रमुख विश्वास पवार म्हणाले, “आमदारांच्या सहकार्यामुळे इतक्या मोठ्या जलतरण तलावाचे लोकार्पण होऊ शकले. अशोकनगरमधील हा जलतरण तलाव ऑलिंपिक दर्जाचा आहे, जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल.” महानगरपालिकेने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य केले, असेही त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!

Spread the love  बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *