बेळगाव : कंग्राळी बी.के. येथील श्री कलमेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची ३१ वी वार्षिक सभा दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला.
या प्रसंगी सोसायटीचे संस्थापक व विद्यमान चेअरमन श्री. तानाजी मिनू पाटील, व्हाईस चेअरमन एस. जी. हुद्दार, संचालक मंडळातील श्री. जीवन अष्टेकर, व्ही. ए. पावशे, एन. पी. पाटील, बी. बी. कडोलकर, एम. एल. तळवार, वसंत बाबुराव सुतार, जयराम विठ्ठल पाटील, लक्ष्मण शिवाजी नाईक, संचालिका मालू एम. पाटील, शेवंता नारायण पाटील, सावित्री वसंत सुतार, पद्मा शंकर बसरीकट्टी, शिल्पा नारायण वाळके तसेच सेक्रेटरी ए.के. कडोलकर उपस्थित होते.
सभेत २०२४-२५ शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा व सेवाक्षेत्रात विशेष यश मिळविलेल्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. यात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्य पातळीवर निवड झालेल्या सुशांत यल्लाप्पा पाटील, धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरीय पातळीवर निवड झालेल्या माधुरी गजानन पाटील आणि युनियन बँकेत मॅनेजर म्हणून नियुक्त झालेल्या नागराज कल्लाप्पा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Belgaum Varta Belgaum Varta