Wednesday , March 4 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे 17 एप्रिल रोजी हरेकृष्ण रथयात्रा

Spread the love


बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर नितायची हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि. 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे.
त्या दिवशी सायंकाळी चार वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार शहापूरमार्गे बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस कडून इस्कॉन मंदिरावर गेल्यानंतर विविध कार्यक्रम होऊन रात्री यात्रेची सांगता होईल.
संध्याकाळी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *