Saturday , July 27 2024
Breaking News

भरतेशकडून अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Spread the love

बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने 22 मार्च रोजी हलगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डनावर हायस्कूल येथे आपल्या तिसऱ्या अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार श्री.अरुण शहापुर, संत मीराचे अध्यक्ष श्री. परमेश्वर हेगडे, डीडीपीआय श्री. बसवराज नलतवाड व ग्रामीण.
बीईओ श्री. आर. पी. जुट्टानावर हे सन्माननीय पाहुणे होते. श्री. श्रीपाल एस. क्षेमलापुरे, श्री. प्रकाश उपाध्ये, श्री. बाहुबली कडेमणी, श्री. विनोद एस. दोड्डनावर, श्री. अशोक दानवडे, श्री. हिराचंद कलमनी, श्री. अनंत लाड आणि भरतेशचे इतर गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्यही उपस्थित होते.
ही प्रयोगशाळा स्वतःमध्ये अद्वितीय आहे. कारण उच्च रिझोल्यूशन आणि ऑटोमेशनसह “की स्टेशन” आणि “दुर्बिण” स्थापित केली आहे. व्यवस्थापनाने अभिमानाने जाहीर केले की पुढील पाच वर्षांत आम्ही आमच्या भरतेश अटल टीकरिंग लॅबमधून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विचार करीत आहोत. श्री. नितीन रेवणकर, लीड कन्सल्टंट (मेंटर) – एलएलएफ यांनी लॅबच्या स्थापनेदरम्यान आपली मौल्यवान माहिती दिली. शाळांमधील विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *