
बेळगाव: सदाशिवनगर येथील मुलींच्या वसतिगृहात सोमवारी एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुमित्रा गोकाक (१९) अशी आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून सदर विद्यार्थिनी जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील ही विद्यार्थिनी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. बेळगावमधील सदाशिवनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सरकारी पोस्ट-मॅट्रिक मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
सकाळी नाश्ता केल्यानंतर खोलीत गेलेल्या विद्यार्थिनीने नंतर दरवाजा बंद करून आत्महत्या केली. तिच्या वर्गमित्रांनी दार ठोठावले पण तिने तो उघडला नाही तेव्हा ही घटना उघडकीस आली. तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

Belgaum Varta Belgaum Varta