

बेळगाव : कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण 2025 संबंधित सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक गणेश मंदिर संभाजीनगर वडगाव येथे पार पडली.
बैठकीला मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. जयराज हलगेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जनगणती करत असताना मराठा समाजाने “धर्म – हिंदू, जात -मराठा, पोटजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी” असा उल्लेख करावा असे आवाहन करत जातीनिहाय जनगणनेतील फॉर्ममध्ये 60 कलमांची सविस्तर माहिती सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव बोलताना म्हणाल्या की, जनगणतीवेळी प्रत्येक मराठा बांधवांनी पोटजात कुणबी अशी आवर्जून नोंद करावी त्याचबरोबर मराठा समाजाने प्रत्येक कार्यात पक्षभेद बाजूला ठेवून सकल मराठा समाज म्हणून एकत्र यावे व कार्य करावे तरच आपला समाज सक्षम होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीदरम्यान शिवानी पाटील, प्रतिभा सडेकर, उमेश पाटील अमोल देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला भाऊसाहेब पाटील, विद्या दळवी यांच्यासह मंगाई भजनी मंडळाच्या अध्यक्ष रेणुका पाटील, उपाध्यक्ष नीता चंदगडकर, खजिनदार विजयालक्ष्मी बगाडे, वैशाली जाधव आणि परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta