बेळगाव : कर्नाटक राज्याच्या मंत्री महोदया सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे जवळचे विश्वासू श्री. युवराज कदम यांचा देसूर काँग्रेस कमिटीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ह.भ.प. सुभाष परीट (विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ अध्यक्ष), भरत लक्ष्मण पाटील (सार्वजनिक गणेशोत्सव पाटील गल्ली अध्यक्ष), सुनील पाटील (माजी ग्राम पंचायत सदस्य), दशरथ बाबू पाटील (देसूर गावचे प्रमुख व्यक्तिमत्व) यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भरमानी मालोजी पाटील, सातेरी काळसेकर, अनिल पाटील, सतीश चव्हाण, जोतिबा काळसेकर, विश्वास पाटील, बाबू पाटील, अप्पूराव पाटील, सातेरी पाटील, रघुनाथ पाटील, उत्तम पाटील, तसेच उचगांव ब्लॉक युवा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Belgaum Varta Belgaum Varta