Monday , September 21 2026
Breaking News

अनिसच्या चार कार्यकर्त्यांना ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, बेळगाव शाखेच्या चार कार्यकर्त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये बेळगाव शाखेचे सचिन जोतिबा अगसीमनी, एस.जी. पाटील, सूर्याजी पाटील आणि शिवाजी हसनेकर या चार कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लातूर येथील ओम लॉन्स मंगल कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अनिसच्या राज्य कार्यकारिणीची सभा झाली, यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रध्दा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोळी हे होते.
माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्याहस्ते समता वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या पुरस्कार वितरणच्या कार्यक्रमाला पीपल्स सायन्स नेटवर्कचे डॉ. विवेक मोंटेरो, प्राचार्य डी. एच. थोरात, डॉ. हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, मिलिंद देशमुख, प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *