हुक्केरी : प्रचंड उत्सुकता निर्माण झालेल्या हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या संचालक पदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून रमेश कत्ती गटाने तब्बल पंधरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
रविवारी उशिरा रात्रीपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये माजी खासदार रमेश कत्ती आणि माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या जोडीने जारकीहोळी बंधूंना मोठा धक्का दिला आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली होती. उर्वरित तीन भावांनीही त्यांना पाठिंबा दिला. तसेच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta