

निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहरात दांडिया-गरब्याचा जल्लोष रंगात सुरू आहे. तरुणाई उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे. शहरातील प्रमुख मंडळे व क्लबतर्फे आकर्षक मंडप, रोषणाई व सजावट करून दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात गरबा, दांडियाची रंगत वाढत आहे. या विविध समाजातील तरुणाई सहभागी होत असल्याने यातून सामाजिक एकोपा दिसून येत आहे. येथील कछ कडवा पाटीदार समाजातर्फे हा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त शहरात आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयीन तरुणाई, महिला व लहानग्या मुलांचा दांडियात उस्फूर्त सहभाग दिसून येत आहे. रात्री आठ नंतर
श्रीनगर, अशोक नगर, कामगार चौक, शिवाजीनगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दांडिया खेळणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. निपाणीकरांसाठी दांडिया-गरबा हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनला आहे. तरुणाईच्या उत्साही सहभागामुळे शहरात उत्सवाची खरी रंगत दिसत आहे.
गरबा, दांडिया खेळण्यासाठी पारंपरिक घागरा-चोळी, कुर्ता-पायजमा व फॅन्सी ड्रेस परिधान करून सहभागी सहभागी होत आहेत. त्यामुळे वातावरण रंगतदार होत असल्याने पाहणाऱ्यांचीही गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त अनेक मंडळांतर्फे रात्री डोल-ताशा, गायकांच्या गाण्यांवर पारंपरिक गरबा गीतांवर ठेका परत आहेत. त्यामुळे वातावरण संगीतमय बनले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta