

बेळगाव : बेळगाव गोल्फ असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते नुकताच देसूर येथील बीजीए क्लबमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
एन. जे. शिवकुमार यांची पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी सलग पाच कार्यकाळ कॅप्टन म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे.
निवडलेले पदाधिकारी :
अध्यक्ष : एन. जे. शिवकुमार
कॅप्टन : वी. सुरेश
सचिव : डॉ. विनय दास्तिकोप्प
खजिनदार : शशी सिदनाळ
व्यवस्थापन समिती सदस्य :
सचिन सबनीस, तुषार पाटील, उत्तम चांडक, रघु कुलकर्णी, प्रविण सरनायक, मिहिर पोतदार.
गोव्याचे रमेश चौगुले यांना गोल्फ मैदानाच्या निर्मितीत केलेल्या भरीव योगदानाबद्दल क्लबचे विशेषाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शिवकुमार यांनी बीजीएला दिवंगत बेविस कुटिन्हो (माजी आयएएस), दिवंगत ओमप्रकाश (माजी आयपीएस) यांचे योगदान व सहकार्य नेहमीच स्मरणात राहील, असे नमूद केले. तसेच तात्काळ माजी अध्यक्ष मोहन यांच्या कार्यकाळातील समर्पणाचे कौतुक केले व सचिव म्हणून गिर्धारी चांडक यांच्या सेवांचा गौरव केला.
शिवकुमार यांनी तरुण पिढीत गोल्फ खेळाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच बेळगावातील नागरिकांसाठी सभासदत्व मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. देसूर येथील गोल्फ मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी त्यांनी कर्नाटक सरकार, केएसटीडीसी तसेच स्थानिक प्रशासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta