

बेळगाव : विजयादशमी निमित्त बेळगाव आणि शहापूरच्या दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.
शेकडो भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते. वेंकट रमण गोविंदा, गोविंदा असा जयघोष करत भक्त रथ ओढत होते. रथाच्या मार्गांवर सडे घालून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सुहासिनी रथाला आरती करत होत्या. रथोत्सवाच्या वेळी भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात येत होते. भक्तांकडून खोबरे, खारीक आणि केळ्याची उधळण करण्यात येत होती. रथोत्सवाच्या मार्गांवर रथावर फुलांची उधळण करण्यात येत होती. शहरातील विविध मार्गांवर फिरून रथोत्सवाची श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाकडे सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta